Clean Up Marshals आता रस्त्यावरून होणार हद्दपार

1374
Clean Up Marshals आता रस्त्यावरून होणार हद्दपार
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जावी आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जावी यासाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शलना (Clean Up Marshals) आता कायमचेच घरी बसवले जाणार आहे. महापालिकेच्यावतीने नियुक्त संस्थांच्या क्लीन अप मार्शल (Clean Up Marshals) बाबत लोकांच्या तक्रारी वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून लवकरच याबाबतचा निर्णय प्रशासन स्तरावर घेवून सर्व संस्थांचे कंत्राट रद्द केले जाणार आहे. त्यामुळे जनतेची लूट करणाऱ्या क्लीन अप मार्शलची (Clean Up Marshals) मोहिमच बंद केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक Qari Shahzad ची गोळ्या झाडून हत्या)

मागील ४ एप्रिल २०२४ पासून मुंबईतील स्वच्छतेच्या संदर्भात कारवाईसाठी क्लीन अप मार्शलची (Clean Up Marshals) नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक संस्थेकडून प्रभागांत ३० मार्शलची नियुक्ती करण्याऐवजी प्रत्यक्षात त्यापेक्षा मार्शल नियुक्त करणे आणि खासगी वेशात फिरून दंड आकारण्याच्या नावावर चिरीमिरी घेवून अस्वच्छता करणाऱ्यांना सोडून देणे अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. त्यातच मागील २० फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी याबाबतचा आढावा घेतला. यामध्ये प्रत्यक्षात मार्शलची (Clean Up Marshals) नियुक्ती झाल्यापासून ते १८ फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये अस्वच्छतेस कारणीभूत ठरलेल्या १ लाख ४० हजार ५८४ नागरिकांकडून ४ कोटी ५४ लाख ५१ हजार ४१२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती.

(हेही वाचा – Kunal Kamra ला कंगना रणौत यांनी सुनावले; म्हणाले…)

या बैठकीनंतरही क्लीन अप मार्शलच्या (Clean Up Marshals) वर्तनात कोणताही बदल न झाल्याने अखेर अस्वच्छतेबाबत कारवाई साठी नेमलेल्या संस्थांच्या क्लीन अप मार्शलची मोहिमच बंद करून मार्शलना कायमचेच घरी बसवण्याच निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु असून पुढील सर्व प्रक्रिया पार पडल्याने नवीन आर्थिक वर्षांपासून क्लीन मार्शलची मोहिम बंद केली जाईल आणि यासाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शलना (Clean Up Marshals) घरी बसवले जाईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.