बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर ते अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. मात्र नागपूर पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री महाराज यांना क्लीनचीट दिली. त्यामुळे अ.भा. अंनिसचे कार्याध्यक्ष श्याम मानव चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
पोलिसांच्या अहवालामुळे शाम वाद मिटणार
नागपुरातील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची पोलिसांत तक्रार केली होती. धीरेंद्र शास्त्री हे समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. त्यावर नागपूर पोलिसांनी या तक्रारीचा तपास केला, त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पोलिसांनी क्लीनचीट दिली. महाराजांच्या बाजुला धर्माच्या प्रचाराशी संबंधित साहित्य पोलिसांना आढळून आले, त्यात अंधश्रद्धा पसरवणारे कोणतेही साहित्य नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. नागपूर पोलिसांनी तक्रारदार श्याम मानव यांचाही लेखी जबाब नोंदवून घेतला आहे. धीरेंद्र शास्त्री महाराज त्यांच्या दरबारात याचना घेऊन येणार्याच्या मनातील समस्या त्याला न विचारात ओळखतात आणि त्या सांगतात, अशा पद्धतीमागे अंधश्रद्धा असल्याचा आरोप शाम मानव यांनी केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. माध्यमांनीही शाम मानव यांच्या म्हणण्यानुसार महाराजांवर आगपाखड सुरु केली, मात्र आता नागपूर पोलिसांच्या अहवालामुळे या आरोपांवर पडदा पडणार आहे.
Join Our WhatsApp Community