भ्रष्टाचार प्रकरणात कोणताही सबळ पुरावा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयकडून (CBI) क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यामुळे पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
नागरी विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यात एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता करून सरकारचं ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, असा आदेश दिला होता. या आदेशानंतर या सर्व कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. त्या प्रकरणात आता त्यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयने कोर्टात सांगितले आहे. (Praful Patel)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community