Cleanliness Campaign : मध्य रेल्वेवर ‘स्वच्छता पंधरवडा

मध्य रेल्वे वर स्थानके , कार्यालयांच्या स्वच्छतेसह होणार जनजागृती

175
Railway Administration: कल्याण-डोंबिवली स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय, नेमकी काय उपाययोजना? वाचा सविस्तर...
Railway Administration: कल्याण-डोंबिवली स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय, नेमकी काय उपाययोजना? वाचा सविस्तर...

मध्य रेल्वेने स्वच्छता पंधरवडा अभियान हाती घेतले आहे. हे अभियान १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार असून या कालावधीत मध्य रेल्वेवरील स्थानके, रेल्वे कार्यालये, वसाहती, कारखाने, देखभाल डेपो, रुग्णालये यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच या पंधरवड्यात स्वच्छतेविषयी जनजागृतीही (Cleanliness Campaign) करण्यात येणार आहे.

प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यालये, युनिट्स आणि डेपोमध्ये श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण व स्वच्छता प्रकल्पाबाबत विविध नाविन्यपूर्ण कामे सुरू करण्यात आली. स्वच्छता पंधरवड्यादरम्यान स्पर्धा आणि जनजागृती रॅलीही काढण्यात येणार असून प्लास्टिकला नाही म्हणा हा संदेश देण्यात येईल. २ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवड्याची सांगता होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा :Trade Deficit Widens : भारतीय व्यापारी तूट १० महिन्यांच्या उच्चांकावर)

मध्य रेल्वेवरील काही महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाट स्वच्छ झाले आहेत. मात्र काही फलाटांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. रेल्वे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. या ठिकाणाची सफाई करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले आहे. स्वच्छतेसोबतच प्रवाशांना स्थानकात चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.