महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता स्पर्धा

112
मुंबईतील विविध गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागामधील हॉटेल्स, शाळा, रुग्णालये (आरोग्यसेवा सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटना यांमध्ये स्वच्छता स्पर्धा राबवविणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची अखेरची तारीख  २९ जानेवारी २०२३ असून हॉटेल्स, शाळा, रुग्णालये, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, मार्केट इत्यादी गटात  ही स्पर्धा होणार आहे.

स्वच्छ भारत मिशनला चालना 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये मुंबई महानगरपालिका भाग घेत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार तसेच अतिरिक्त  आयुक्त (शहर)  आशिष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील विविध गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत  महानगरपालिका २४ विभागामधील हॉटेल्स, शाळा, रुग्णालये (आरोग्यसेवा सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटना यांमध्ये स्वच्छता स्पर्धा राबवविणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिका मुंबईतील नागरिकांकडून ‘स्वच्छ भारत मिशन’ या विषयावरील जिंगल, चित्रफीत, पोस्टर / रेखांकन, भित्तीचित्र, पथनाट्ये इत्यादी आणि ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’ अंतर्गत व्यक्ती, स्टार्ट-अप, कंपन्या, शैक्षणिक संस्थांकडून सामाजिक समावेश, शून्य कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पारदर्शकता (डिजिटल सक्षमीकरण) यांसारख्या क्षेत्रात स्वच्छ भारत मिशनला चालना मिळेल, या प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची अखेरची तारीख २९ जानेवारी २०२३ असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उप आयुक्त  चंदा जाधव यानी दिली आहे.

२९ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज भरता येणार

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता भारत तोरणे यांनी सांगितले की, सदर स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक व्यक्ती / गट यांनी https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan23 या लिंकचा वापर करुन अर्ज व माहिती भरावयाची आहे. या स्वच्छता स्पर्धा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘युनायटेड वे मुंबई’ या संस्थेची नियुक्ती केली आहे. मुंबई महानगरपालिका इच्छुक स्पर्धकांना सदर स्वच्छता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक स्पर्धक  २९ जानेवारी २०२३ पर्यंत https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan23 या लिंक वर संपूर्ण तपशील भरू शकतात. अपूर्ण अर्ज असलेल्या स्पर्धकांना माहिती न देता त्यांचे अर्ज फेटाळले जातील, याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.

जिंगल, पोस्टर,पथनाट्य

स्पर्धेच्या प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मुंबई महानगरपालिकेतर्फे गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत एकूण ८ प्रमुख गट असून त्यामध्ये ५० पेक्षा अधिक व्यक्तिंना बसण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्स, महानगरपालिका शाळा, खासगी शाळा, महानगरपालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, १ ते १०० सदनिका असलेले निवासी संकुल, १०१ ते ५०० सदनिका असलेले निवासी संकुल, शासकीय व निम शासकीय कार्यालय, मंडई, कचरा वर्गीकरण – कंम्पोस्टींग – घन कचरा व्यवस्थापन इत्यादीबाबत जिंगल, चित्रफित, पोस्टर, पथनाट्य यासारख्या विविध विषयांचा स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार आहे.

याठिकाणी साधा संपर्क

या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी तसेच सहभागी होण्यासाठी ग्रँटरोड पश्चिम परिसरातील खटाव मार्केट येथे ५ व्या मजल्यावर असणा-या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालय संपर्क क्रमांक ०२२-२३८५-०५७२ असा आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.