Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचा मार्ग मोकळा; ‘ती’ कातळशिल्पे यादीतून वगळली?

'युनेस्को'ने रत्नागिरीतील ७, सिंधुदुर्गमधील १ आणि गोव्यातील ९ कातळशिल्पांना जागतिक वारसास्थळाच्या तात्पुरत्या यादीत स्थान दिले आहे.

142
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचा मार्ग मोकळा; 'ती' कातळशिल्पे यादीतून वगळली?
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचा मार्ग मोकळा; 'ती' कातळशिल्पे यादीतून वगळली?

कोकणातील मानवी उत्क्रांतीचा उलगडा करणारा हजारो वर्षापूर्वीचा ठेवा म्हणून कातळशिल्पांकडे पाहिले जाते. कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवर (बारसू) अशी कातळशिल्पे आढळल्यामुळे हा प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र, रिफायनरी मार्गी लावण्यासाठी येथील कातळशिल्पांना संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७, सिंधुदुर्गमधील १ आणि गोव्यातील ९ कातळशिल्पांना जागतिक वारसास्थळाच्या तात्पुरत्या यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी राजापूर तालुक्यातील कशेळी येथील कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्यात आले आहे. आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, प्रस्तावित बारसू रिफायनरी परिसरातील कातळशिल्पांना या संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात आल्याने रिफायनरीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकीचा मेल, मागितली ५०लाख रुपयांची खंडणी)

कोकणात किती कातळशिल्पे?

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १७० गावांमध्ये १,७०० पेक्षा अधिक कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील कशेळीच्या १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला. इतर ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून, त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही हा दर्जा मिळू शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.