Nagthane Satara : भारतमातेचा जयघोष न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळांवर कारवाई करा; नागठाणे ग्रामसभेची एकमुखी मागणी

235
Nagthane Satara : भारतमातेचा जयघोष न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळांवर कारवाई करा; नागठाणे ग्रामसभेची एकमुखी मागणी
Nagthane Satara : भारतमातेचा जयघोष न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळांवर कारवाई करा; नागठाणे ग्रामसभेची एकमुखी मागणी

सातारा जिल्ह्यातील नागठाणे (Nagthane Satara) येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका समूहाने देशाभिमानाच्या घोषणा दिल्या नाहीत. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने बुधवार, २१ ऑगस्ट रोजी नागठाणे गाव बंद करण्यात आले. या वेळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घोषणा न देणार्‍या विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्याची जोरदार मागणी केली. कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Kolkata Doctor Murder Case: संजय रॉयचे सायको ॲनालिटिकल प्रोफाइल आलं समोर; कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही)

ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. उपस्थितांनी संबंधित शाळेवर कारवाई झालीच पाहिजे, शाळा बंद करा अशी मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून डीवायएसपी राजीव नवले, सपोनी रवींद्र तेलतुंबडे, पीएसआय स्मिता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बोरगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागठाणेतील सर्व शाळांनी मोठ्या उत्साहात गावातून प्रभातफेरी काढली. यामध्ये गावातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. नागठाणे येथील सोसायटीच्या मोठ्या चौकात प्रभात फेरी आल्यानंतर मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ (Bharat Mata Ki Jai), ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) अशा घोषणा दिल्या. मात्र एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी या घोषणा दिल्या नाहीत. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी देशाचा अवमान करणाऱ्या केलेल्या या कृतीचा निषेध होऊ लागला आङे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गेले पाच दिवस वातावरण तणावपूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना व युवकांनी बोरगाव पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतीला निवेदन दिले. त्यानंतर बुधवारी सकाळी सर्व संघटनांनी गाव बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच तातडीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश द्या

नागठाणेत (Nagthane Satara) असा धार्मिक कट्टरतावाद वाढीस लागणे धोकादायक आहे. त्यामुळे या शाळा बंद करून त्यांना दुसर्‍या शाळा, महाविद्यालयात प्रवेश द्यावा अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली. ग्रामस्थांच्या शाळा बंद करण्याच्या मागणीचा विचार करून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, ग्रामविकास अधिकारी सुरेश लादे यांनी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.