आता दिवाळीचा केला ‘जश्न-ए-रिवाज’! ट्विटरवर युजर्सनी व्यक्त केला संताप

दिवाळी जवळ आल्याने बरेच फॅशन ब्रॅन्ड आपल्या कपड्यांना सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी नवनवीन कल्पना घेऊन बाजारात उतरत आहेत. असाच एक कपड्यांचा ब्रॅन्ड असलेल्या फॅब इंडियाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे नामकरण जश्न-ए-रिवाज केलं आहे. पण याला इंटरनेटवर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अनेक सोशल मीडिया युजर्सनी हिंदू सण आणि त्यांच्या भावनांचा खेळ मांडला असल्याचं म्हणत यावर आक्षेप घेतला आहे.

युजर्समध्ये नाराजी

दिवाळी सारखा हिंदूंचा मोठा सण तोंडावर असताना फॅब इंडियाने उचललेले हे पाऊल खर तर हिंदुंच्या संस्कृतीवर घाला घालण्याचं काम आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्स अस्वस्थ झाले आहेत. दिवाळीचे जश्न-ए-रिवाजमध्ये नामांतरण केले जाणे अनेक युजर्सना अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे फॅब इंडियावर जोरदार टीका करण्यात येत आहे. या टीकेनंतर आता फॅब इंडियाने आपल्या ट्टिटरवरुन याबाबतची पोस्ट काढून टाकली आहे.

या ट्वीटमध्ये जश्न-ए-रिवाज हा शब्द पाहून वापरकर्ते चांगलेच संतापले आहेत. याचा निषेध करताना भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी जोरदार टीका केली आहे. हे हिंदू सणांचे इब्राहिमायझेशन असून, हिंदू पोशाख न घातलेल्या मॉडेल्सचे प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे. यावर सर्वांनी बहिष्कार टाकून आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इतकंच नाही फॅब इंडिया न्यूज सारख्या ब्रँडने अशा कृत्यांसाठी आर्थिक भरपाई देखील द्यावी, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

(हेही वाचाः भोपाळमध्ये देवी विसर्जनादरम्यान भरधाव गाडीने भाविकांना चिरडले! आरोपी अटकेत)

ट्विटरवर जोरदार टीका

लेखिका, वक्ता आणि वस्त्रप्रेमी शेफाली वैद्य यांनीही फॅब इंडियाला यावरुन फटकारलं आहे. वाह.. फॅब इंडिया दीपावली सारख्या हिंदू सणाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठतेत उत्तम काम केल्याबद्दल. दीपावलीला ‘प्रेमाचा आणि प्रकाशाचा सण’ म्हणा, त्याला ‘जश्न-ए-रिवाज’ या कलेक्शनचे शीर्षक द्या, मॉडेलच्या कपाळावरुन टिकली काढा आणि हिंदूंनी ‘भारतीय संस्कृतीला श्रद्धांजली’ देऊन, तुमचे महागडे कपडे मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची अपेक्षा करा. अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.

मी भारतीय आहे आणि मी जश्न-ए-रिवाज कधी साजरा केला नाही. कधी ऐकले नाही. पृथ्वीवर हा सण आहे का?, असा सवाल अननी संपत वीरवल्ली या ट्विटर युजरने केला आहे.

(हेही वाचाः दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या!)

विवेक अय्यर या युजरने ट्वीट केले आहे की, abFabindiaNews ने #MiladUnNabi चे नाव बदलून #JashneRiwaaz ठेवले आहे. त्यांची चांगली विक्री व्हावी. पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते की यात दाखवलेले रंग खूप भडक आहेत. त्यापेक्षा हिरवा रंग असता, तर ते योग्य वाटले असते.

ब-याच युजर्सनी तर फॅब इंडियाला बॅायकॅाट करा असं म्हटलं आहे. सध्या ट्विटरवर #boycottfabindia ट्रेंड सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here