Cloudburst Rain: चिपळूणमध्ये पावसाचा कहर! अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस

292
Cloudburst Rain: चिपळूणमध्ये पावसाचा कहर! अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस
Cloudburst Rain: चिपळूणमध्ये पावसाचा कहर! अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस

चिपळूण (Chiplun) सह्याद्री भागात अवकाळी पावसाचा कहर (Cloudburst Rain) सुरू आहे. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या आहेत. चिपळूणमध्ये ढगफुटीसदृश पाऊस सुरू आहे. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. (Cloudburst Rain)

(हेही वाचा –दादरमधील Mcdonald मध्ये बॉम्बस्फोट होणार ? मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला फोन)

जुलै मध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. या गावातील पाण्याने तुडुंब भरुन गेलेली शेतं आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. (Cloudburst Rain) अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला, याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे. (Cloudburst Rain)

(हेही वाचा –धक्कादायक! Char Dham Yatra करताना ५ दिवसांत ११ भाविकांचा मृत्यू)

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून होऊ शकते. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाले आहेत. गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाल्याचे मानले जात आहे. (Cloudburst Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.