Chief Minister Medical Assistance Cell होणार पेपरलेस; स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू होणार

71
Chief Minister Medical Assistance Cell होणार पेपरलेस; स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू होणार
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला (Chief Minister Medical Assistance Cell) आता अधिक सुलभ व पेपरलेस स्वरूप दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार असून, यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही. लवकरच या प्रक्रियेसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

नवीन प्रणालीद्वारे, अर्थसहाय्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला जाईल. शासनाच्या इतर योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आजारांना या योजनेत समाविष्ट केले जाणार असून, यामुळे अधिकाधिक रुग्णांना आर्थिक मदत पोहोचू शकेल.

(हेही वाचा – Pollution in Mumbai : नवी मुंबईतील विकासकांकडून प्रदूषण नियमांचे उल्लंघन; दीड कोटींची दंडवसूली)

चॅरिटी पोर्टल आणि सीएमआरएफ पोर्टल एकत्र

गरजू नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्र जोडली जाणार आहे. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार, अर्ज प्रक्रियेत लागणाऱ्या एओ क्रमांक आणि एम क्रमांकांचे एकत्रीकरण केले जाईल. यामुळे अर्ज प्रक्रियेत वेग आणि सुलभता येईल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे (Chief Minister Medical Assistance Cell) अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय, आपत्तीच्या वेळीही या निधीचा उपयोग होतो. आतापर्यंत हजारो रुग्णांना या कक्षाच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे.

(हेही वाचा – Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता)

जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’

नागरिकांना त्यांच्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात वारंवार जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येईल. याबाबतचा शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. या कक्षामुळे नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच त्यांच्या अर्जांची सद्यस्थिती जाणून घेता येईल आणि त्यांना लागणारे सहाय्य त्वरित मिळेल.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणनीती; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ निर्देश)

डॉक्टरांची तज्ज्ञ समिती स्थापन

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister Medical Assistance Cell) अंतर्गत येणाऱ्या आजारांचे पुनर्विलोकन, अर्ज भरण्यासाठी सहाय्य, तसेच अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या मदतीने राज्यातील आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख आणि सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या (Chief Minister Medical Assistance Cell) प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांना या सुविधांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नवीन प्रणालीमुळे नागरिकांची वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून, आरोग्यसेवेसाठी गरजूंना अधिक तत्परतेने मदत मिळेल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला पेपरलेस बनवण्याच्या निर्णयामुळे राज्यातील आरोग्य सेवांमध्ये मोठा बदल घडेल. ऑनलाइन प्रणालीमुळे आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया सोपी, गतिमान आणि पारदर्शक होईल. त्यामुळे गरजू नागरिकांना वेळेत मदत मिळून त्यांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण वेगाने होऊ शकेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.