- विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांना महिना उलटत आला तरी त्यांना मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेची काही आठवण झालेली नाही. मुंबईतील स्वच्छतेकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष असणे आवश्यक आहे. परंतु, आचारसंहितेनुसार तीन ते चार शनिवारी तथा रविवारी ही मोहीम राबवली गेली, पण आजतागायत नव्या मुख्यमंत्र्यांना या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छाच झालेली नाही. त्यामुळे शिंदेंच्या योजना फडणवीसांना मान्य नाही का असा सवाल केला जात आहे. (CM Cleanliness Campaign)
संपूर्ण शहरात साफसफाई ठेवून स्वच्छतेचा स्तर उंचावणे हे मुंबई महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने मुंबईतील रस्ते, पदपथ आणि सभोवतालच्या परिसराची नियमित निगा राखणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिकेमार्फत २१ नोव्हेंबर २०२३ पासून ‘मुख्यमंत्री संपूर्ण स्वच्छता मोहिम’ सुरु करण्यात आली आहे. या व्यापक उपक्रमामध्ये फुटपाथ व रस्ता दुभाजक यांची रंगरंगोटी करणे, इतरत्र पडलेले बांधकामाचे डेब्रिज काढणे, अनधिकृत फलक/होर्डिंग्ज हटविणे, रस्त्यावर बेवारस पडून राहिलेल्या भंगार वाहनांची विल्हेवाट लावणे, रस्त्यावरील धुळीचे वा अनावश्यक झुडपांचे उच्चाटन करणे इत्यादी बाबींचा समावेश होता. (CM Cleanliness Campaign)
(हेही वाचा – Dr. Bhau Daji Lad Museum इंटॅक आणि बजाज फाऊंडेशनच्या ताब्यात, तरीही…)
या मोहिमेसाठी महानगरपालिकेतर्फे ६१ मुद्दे असलेली प्रमाणित कार्यपद्धती अर्थांत एसओपी काटेकोरपणे तयार केलेली आहे. या मोहिमेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २१ नोव्हेंबर २०२३ पासून १३ ते १४ वेळा व्यक्तिशः सहभागी झाले होते. (CM Cleanliness Campaign)
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेत लोकसहभागावर भर दिलेला आहे. ही मोहीम आता फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीच मर्यादित राहिलेली नसून यात स्वयंसेवी संस्था, शाळा तथा महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक सक्रियपणे सहभागी होत आहेत. एकूणच, या मोहिमेस एका लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (CM Cleanliness Campaign)
(हेही वाचा – 2 Tier Test Championship ? कसोटी संघ दोन श्रेणींमध्ये विभागले जाणार? भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांची चर्चा सुरू)
मात्र, आचारसंहितेनंतर प्रत्यक्षातही मोहीम पुन्हा सुरुवात केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा झालेली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ नोव्हेंबर २०२३ पासून मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता. परंतु ही स्वच्छता मोहीम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे. (CM Cleanliness Campaign)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community