CM Devendra Fadnavis : 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार; महाराष्ट्राने घडवला इतिहास

40
CM Devendra Fadnavis : 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार; महाराष्ट्राने घडवला इतिहास
  • प्रतिनिधी 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी करत 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकींचे 54 सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात झालेल्या या करारांमुळे 15.75 लाख नवीन रोजगार निर्मिती होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज, अ‍ॅमेझॉन, टाटा समूह यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी केलेल्या करारांमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

महत्त्वाचे करार :

दिवस 1 व 2 : 21-22 जानेवारीच्या गुंतवणुकीचा आढावा

रिलायन्स इंडस्ट्रीज लि. :

गुंतवणूक : ₹3,05,000 कोटी
रोजगार : 3,00,000
क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, हरित ऊर्जा, डेटा सेंटर्स, औद्योगिक विकास

अ‍ॅमेझॉन :

गुंतवणूक : ₹71,795 कोटी
रोजगार : 83,100
क्षेत्र : डेटा सेंटर्स

(हेही वाचा – Australian Open 2025 : बहुचर्चित स्पर्धेत नोवाक जोकोविचची कार्लोस अल्काराझवर मात)

वर्धान लिथियम :

गुंतवणूक : ₹42,535 कोटी
रोजगार : 5000
क्षेत्र : लिथियम बॅटरी उत्पादन (नागपूर)

टाटा समूह :

गुंतवणूक : ₹30,000 कोटी
क्षेत्र : बहुविध

हिरानंदानी समूह :

गुंतवणूक : ₹51,600 कोटी
क्षेत्र : पायाभूत सुविधा

ब्लॅकस्टोन :

गुंतवणूक : ₹43,000 कोटी
क्षेत्र : पायाभूत सुविधा

(हेही वाचा – Crime : बहिणीच्या साखरपुड्यात राडा घालणाऱ्या चुलत भावाच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी; तिघांना अटक)

सिएट :

गुंतवणूक : ₹500 कोटी
रोजगार : 500
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही (नागपूर)

ग्रिटा एनर्जी :

गुंतवणूक : ₹10,319 कोटी
रोजगार : 3200
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स (चंद्रपूर)

इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज :

गुंतवणूक : ₹12,780 कोटी
रोजगार : 2325
क्षेत्र : अंतरिक्ष व संरक्षण (नागपूर)

(हेही वाचा – Jalgaon Train Accident : चहावाल्याने असे काय सांगितले ज्यामुळे प्रवाशांनी थेट रेल्वे डब्यातून उड्या मारल्या )

शाश्वत ऊर्जा क्षेत्राचा भर

हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासावर भर देत महाराष्ट्राने अनेक गुंतवणुकींची घोषणा केली :

पॉवरिन ऊर्जा : ₹15,299 कोटी
ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज : ₹15,000 कोटी
रेनिसन्स सोलार : ₹5000 कोटी
हॅझेरो इंडस्ट्रीज : ₹16,000 कोटी (बुटीबोरी)

रोजगारनिर्मितीची संधी

या गुंतवणुकीतून 15.75 लाख रोजगार निर्माण होणार असून, सेवा क्षेत्र, हरित ऊर्जा, उत्पादन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, डेटा सेंटर्स, आणि सामाजिक क्षेत्रांत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

दावोसच्या दौऱ्यातील इतर वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वाहतूक आणि हरित ऊर्जा क्षेत्रात सहकार्यावर चर्चा झाली. ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम, डीपी वर्ल्डचे सुलतान अहमद बिन सुलाएम आणि इतर जागतिक नेत्यांशीही चर्चा करण्यात आली.

(हेही वाचा – घुसखोर बांगलादेशी महिलेने Ladki Bahin Yojana चा लाभ घेतल्याचा वकिलाचा दावा)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

“महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” असे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. या गुंतवणुकींमुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल व सर्व भागांत समतोल प्रगती साधली जाईल.

एकूण गुंतवणूक : ₹15.70 लाख कोटी
एकूण रोजगारनिर्मिती : 15.75 लाख

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.