-
प्रतिनिधी
राज्यात आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती’ जाहीर केली आहे. या सात सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरगरिबांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने स्थापन झालेल्या या समितीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली.
(हेही वाचा – परभणी जिल्ह्यात शिवसेना उबाठा, शरद पवार गटाच्या नेत्यांचा BJP मध्ये प्रवेश; पक्षाला बळकटी)
ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले की, “माझे ध्येय आहे – ‘नो फाइल, ओन्ली लाइफ’. गरजवंतांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.” ही समिती आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल, तसेच योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मार्गदर्शन करेल. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, हा या समितीचा मुख्य हेतू आहे. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना CM Devendra Fadnavis यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ९० टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कवच देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. समितीच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या समितीत शेटे यांच्यासह सहा अन्य सदस्यांचा समावेश असून, त्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. या निर्णयाचे स्वागत करताना भाजपा नेत्यांनी सांगितले की, ही समिती आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणेल. यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवांना नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community