मराठीला ज्यांनी समृद्ध केलं, मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लावण्यात आली आहे. कर्नाटकच्या मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, आम्ही बेळगावच्या (Belagavi) विधानसभेतून (karnataka assembly) स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू. देशाच्या इतिहासामध्ये दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्यसेनानी, या देशाचे मानबिंदू आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकमध्ये चालू असलेल्या राजकारणाचा निषेध केला.
(हेही वाचा – Veer Savarkar यांची महती इंदिरा गांधींना समजली, पण कर्नाटकातील काँग्रेस सरकारला नाही; रणजित सावरकर यांचा घणाघात)
महाराष्ट्र विधिमंडळाच्या तीन दिवसीय अधिवशेनाचा ९ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. या वेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानपरिषदेची विशेष बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
वीर सावरकरांची प्रतिमा विधीमंडळात लावा – उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आवाहन
या महत्त्वाच्या मुद्द्याची तत्काळ दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील जनता बेळगाव, कारवार, भालकी, बिदर या भागातील सीमावासियांसोबत आहे, अशा प्रकारचा ठराव पण आपण केलेला होता. आज जी भूमिका मांडली गेली आहे, ती योग्य आहे. सावरकरांच्या प्रतिमेच्या संदर्भातील मुद्द्याचा पाठपुरावा राज्य सरकार तर करेलच परंतु, विधानपरिषदेची उपसभापती या नात्याने या सभागृहाच्या वतीने मी कर्नाटकच्या विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र देणार आहे की, सावरकरांची प्रतिमा तुम्ही विधानमंडळामध्ये ठेवावी.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community