-
प्रतिनिधी
सोळावा वित्त आयोग ८ व ९ मे २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या आढावा बैठकीत राज्यातील वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
(हेही वाचा – IPL 2025, Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये यशस्वी गोलंदाजांच्या मांदियाळीत दाखल)
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर, सदस्य एस. चंद्रशेखर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, तसेच सचिव ए. शैला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – मराठी भाषेबाबत MNS आक्रमक; कल्याणमध्ये बँकांना दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम)
बैठकीत वित्त विभागाकडून १६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध सादरीकरणांची व प्रस्तुतींची माहिती देण्यात आली. अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनी तयारीसंदर्भातील तपशीलवार माहिती सादर केली. राज्याच्या वित्तीय गरजा, प्राधान्यक्रम व योजना प्रभावीपणे आयोगासमोर मांडण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community