CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवन’चे भूमिपूजन

35
CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवन’चे भूमिपूजन
CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवन’चे भूमिपूजन

राज्याच्या परिवहन विभागाच्या मुख्यालयासाठी “परिवहन भवन” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

राज्यातील वाहतूक व्यवस्थेचे नियमन करणारा परिवहन विभाग १ मार्च १९४० रोजी स्थापन झाला. त्यामुळे हा दिवस “परिवहन दिन” (Transportation day) म्हणून साजरा केला जातो. याच औचित्य साधून मुंबईतील सर पोचखानवाला मार्ग, वरळी येथे चार मजली प्रशस्त “परिवहन भवन” इमारतीच्या उभारणीस प्रारंभ केला जाणार आहे.

(हेही वाचा – Revenue Department : गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार ; महसूल मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य)

१२,८०० चौरस मीटर क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सुविधा

या नव्या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र १२,८०० चौरस मीटर असून, त्यामध्ये चार मजली भूमिगत पार्किंग सुविधा असेल. येथे एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील. संपूर्ण इमारत अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे.

८५ वर्षांची प्रतीक्षा संपली!

विशेष म्हणजे, राज्याला दरवर्षी १५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या परिवहन विभागाच्या मुख्यालयाला अद्याप स्वतःची इमारत नव्हती. गेल्या ८५ वर्षांपासून हा विभाग भाड्याच्या इमारतीत कार्यरत होता.

परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत मुख्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचा संकल्प सोडला आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते रविवारी २ मार्च रोजी या ऐतिहासिक इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.