संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी ठाणे येथे केले. (CM Eknath Shinde)
राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरूवात शनिवारी, १३ जानेवारी रोजी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून (Kopineshwar temple) केली, आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, परिवहन सभापती विलास जोशी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: हातात झाडू घेऊन कौपिनेश्वर मंदिर (Kopineshwar temple) परिसरात झाडलोट केली व त्यानंतर मंदिराचा मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Massive Fire : डोंबिवलीत बहुमजली इमारतीच्या ११ मजल्यांना लागली भीषण आग)
महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक
ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिराच्या (Kopineshwar temple) साफसफाईला स्वतः सुरुवात करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई-ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. केंद्र सरकारने (Central Govt) राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देऊन गौरविले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. (CM Eknath Shinde)
मुंबई-ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचे रूपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे, यासाठी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Indigo Bumper 2023 : २०२३ मध्ये इंडिगो एअरलाईन्समधून १०० दशलक्ष प्रवाशांनी केला प्रवास)
सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम
येत्या दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही सांगितले. (CM Eknath Shinde)
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Campaign) अंतर्गत आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community