आता जनावरांसाठी सुद्धा तयार करणार क्वारंटाईन सेंटर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता जनावरांमध्ये पसरत असणा-या लम्पी स्कीन आजाराच्या संदर्भात देखील राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. जनावरांमध्ये या संसर्गजन्य आजाराचा होणारा वाढता प्रादुर्भाव बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. लम्पी त्वचा रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

क्वारंटाईन सेंटर्सची स्थापना

लम्पी स्कीन आजार राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर्सची स्थापना करण्यात येणार असून,जी जनावरे या आजारामुळे मृत पावली आहेत त्यांचा मोबदला संबंधित शेतक-यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

(हेही वाचाः ईडीची मोठी कारवाई, Paytm सह इतर पेमेंट कंपन्यांचे कोट्यवधी रुपये गोठवले)

टास्क फोर्सची स्थापना

लम्पी आजारावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांचा असलेला हा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. लम्पी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस करण्याचे काम टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, या लसीकरणाचा संपूर्ण राज्य सरकार करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here