CM Eknath Shinde : मराठी भाषा भवन, भागोजी शेठ कीर स्मारकासह तब्बल ३२ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

286
CM Eknath Shinde : मराठी भाषा भवन, भागोजी शेठ कीर स्मारकासह तब्बल ३२ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
CM Eknath Shinde : मराठी भाषा भवन, भागोजी शेठ कीर स्मारकासह तब्बल ३२ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत विशाल समुद्रासमोर मराठी भाषा भवनाच्या निर्माण होणार आहे, ही बाब प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. राज्यात सर्वत्र सध्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालत विकासकामे सुरू आहेत. मुंबईतील अशा विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज झाले, ही महत्वाची बाब आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील मराठी भाषा भवन, नाना शंकर शेट स्मारक यासह तब्बल ३२ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण प्रसंगी काढले.

CM Eknath Shinde मराठी भाषा भवन भागोजी शेठ कीर स्मारकासह तब्बल ३२ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) नजीक नेताजी सुभाषचंद्र मार्गावर जवाहर बाल भवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते रविवारी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Bombay High Court ने जे.जे. रुग्णालयाला खडसावले; वैद्यकीय मंडळाच्या असंवेदनशीलतेप्रती व्यक्त केली तीव्र नाराजी)

जवाहर बालभवनाजवळील नियोजित मराठी भाषा भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. तर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे; शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे तसेच संबंधित अधिकारी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – Baba Siddique बॉलिवूड आणि मुंबईच्या बांधकाम लॉबीवर प्रभाव टाकणारा नेता; सोशल मीडियातील वादात सापडला)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मान्यवरांनी सुरुवातीला मराठी भाषा भवन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. विविध विकासकामांवर आधारित चित्रफित यावेळी सादर करण्यात आल्या. लोकार्पण व भूमिपूजन होत असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्प, उपक्रम, विकास कामांच्या ठिकाणांहून स्थानिक नागरिक दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी संबोधित करताना म्हणाले की, कालच दसरा साजरा झाला आणि दिवाळीची चाहूल लागली. पण, महाराष्ट्रात ३ ऑक्टोबरपासूनच म्हणजेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात झाली आहे.

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविक केले. केसरकर म्हणाले की, मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा असून मुंबईतच मराठी भाषा भवन होणे अभिमानास्पद आहे. मुंबई हे सर्वसामान्य नागरिकांचे शहर आहे, ही भावना लक्षात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी मुंबईमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून मुंबई महानगराचा नावलौकिक आणखी उंचावेल, असेही दीपक केसरकर म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक म्हणाले की, मराठी ही भाषा मुळातच अभिजात होती. केंद्र शासनाने त्यास अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजमान्यता दिली. जिथली भाषा समृद्ध असते ते राष्ट्र समृद्ध असते. मराठीनेही या राष्ट्राला समृद्ध केले आहे, असे कर्णिक यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यास दाद दिली. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

(हेही वाचा – Bangladeshi Hindu : बांगलादेशने हिंदूंना संरक्षण देण्याची भारत सरकारची मागणी)

आज भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प
  •  नेताजी सुभाषचंद्र मार्गावर मराठी भाषा भवनाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन
  •  नवी मुंबईतील ऐरोलीत उभारण्यात येणाऱया मराठी साहित्यिक सदर इमारतीचे भूमिपूजन
  •  सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन
  •  जवाहर बालभवन, मुंबई या इमारतीमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रेक्षागृह, संगीत कक्ष, ग्रंथालय व इतर अनुषंगिक कामांचा शुभारंभ
  •  सर ज. जी. कला संस्था वसतिगृह व सर ज. जी. वास्तुशास्त्र वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन
  •  शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालये मुले व मुलींचे वसतिगृह, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  •  महाराष्ट्र राज्य तंत्र निकेतन मंडळ, प्रशासकीय इमारत, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  •  वरळी, मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  •  नायगाव, दादर, भायखळा, शिवडी, शीव (सायन), वरळी पोलीस वसाहत लोकार्पण/भूमिपूजन
  •  उमरखाडी, डोंगरी, डेव्हिड ससून येथील बालसुधारगृह बांधकामांचे लोकार्पण
  •  नागरिक, देशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी भारतीय औषधी पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी पोद्दार रुग्णालय, वरळी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पंचकर्म सुविधांचा शुभारंभ.
  •  सेंट्रल बस स्टॅण्ड व मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहक/चालक यांच्याकरिता वातानुकूलित विश्रामगृहाचे लोकार्पण
  •  नूतनीकरण केलेल्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार भवन व विविध क्रीडा सुविधा संकुलाचे लोकार्पण
  •  मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रम भूमिपूजन
  •  मुंबादेवी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन
  •  महालक्ष्मी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन
  •  बाबुलनाथ मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ
  •  कै. श्री. जगनाथ शंकरशेट यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
  •  कै. श्री. भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
  •  जे. जे. उडाणपुलाखालील हो- हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालय लोकार्पण
  •  ए विभाग, मुंबई येथील बधवार पार्क येथे फूड प्लाझाचा शुभारंभ
  •  ए ते डी वॉर्ड येथे पिंक टॉयलेटचे लोकार्पण
  •  मुंबई शहरामध्ये १४ ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ व ७ ठिकाणी भूमिपूजन
  •  फॅशन स्ट्रीटच्या कायापालटाचा शुभारंभ व भूमिपूजन
  •  मुंबई शहरातील दलित वस्तीमध्ये दहा ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ
  •  ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयी सुविधा उपक्रमाचा शुभारंभ
  •  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेसवरील किचन गार्डनचे लोकार्पण
  •  मुंबई शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण
  •  श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या मंजूर प्रकल्पाचे सादरीकरण
  •  दादर चौपाटी किनारा पुनर्भरणी
  •  मुंबई शहरातील जुन्या म्हाडा इमारतींमध्ये उद्वाहन (लिफ्ट) सुविधा निर्माण करणे
  •  सर ज. जी. रुग्णालयातील वॉर्ड नूतनीकरण व यंत्रसामुग्री लोकार्पण
  •  वरळी दुग्धशाळा येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.