अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (LK Advani) यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. (CM Eknath Shinde)
प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या लालकृष्ण आडवाणी जी (LK Advani) यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे, अशा शब्दात शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आडवाणी (LK Advani) यांचा गौरव केला आहे. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेसाठी महापालिकेचा क्लबशी असा समझौता)
उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असे अभिष्टचिंतन करून शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आडवाणी (LK Advani) यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community