CM Eknath Shinde: ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकारकडून कल्याणकारी महामंडळ स्थापन

236
CM Eknath Shinde: ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकारकडून कल्याणकारी महामंडळ स्थापन

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी (Auto-Taxi Driver) दिलासादायक बातमी आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना ग्रॅच्युईटी (Auto-Taxi Driver Gratuity) देण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ग्रॅच्युईटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. (CM Eknath Shinde)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकरणात येण्यापूर्वी रिक्षा चालक होते. असा उल्लेख केला जातो. अखेर या टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी एक रिक्षावालाच धावून आला आहे. असे विधान रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघानेच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी या चालकांसाठी कल्याणकारी मंडळ (Welfare Board for Rickshaw Taxi Drivers) निर्माण केल्याची घोषणा केली.  (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Narendra Modi: गंगा मातेने मला दत्तक घेतले, रात्रंदिवस मेहनत करेन; गंगामातेची आरती करून मोदींनी घेतली शपथ)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आपण कल्याणकारी मंडळ निर्माण केले आहे. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. टॅक्सी चालकांना ग्रॅच्युएटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे  वर्षाला तीनशे रुपये त्यासाठी तुम्हाला भरावे लागतील. याचे काही पैसे हे सरकार देणार आहे यावर काम सुरू असून, चालकांच्या  परिवाराला विमा संरक्षण दिले जाईल.  (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Market Department : अनधिकृत शेळ्या, मेंढ्या पकडण्यावरच तीन वर्षांत पावणे दोन कोटींचा खर्च)

तसेच ज्यांची मुले आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केला आहे. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. ग्रॅच्युईटी दिली जाईल, यासाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  (CM Eknath Shinde)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.