CM Eknath Shinde : सरकारने घेतला खड्ड्यांचा धसका; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

270
उद्धव ठाकरेंनी राज यांना बाजूला केले; CM Eknath Shinde यांचा खळबळजनक दावा

तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि पूलांवरील खड्ड्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत मुंबईसह राज्यभरातील रस्ते खड्डेमुक्त करा. तसेच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पूलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा, असे निर्देश दिले आहेत. कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्यास कारवाई करणार, असल्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील शासन आदेश जाहीर केला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.

(हेही वाचा – Zero Prescription Scheme च्या निविदा प्रक्रियेला बांगर निघाले गती द्यायला)

राज्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असून, वाहन चालवणे वाहन चालकाला जोखमीचे झाले. गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आल्याने बाप्पाच्या आगमन खड्डे रस्त्यातून होत आहे. मुंबई सह राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मागील आठवड्यात दिले होते. परंतु अद्याप पुल आणि रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात येत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. रस्त्यांवर खड्डे पडल्याने सरकार विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. शासनाची प्रतिमा देखील मलिन झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यामुळे अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रस्त्यांवरील खड्डे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णत: बुजवले गेले पाहिजेत. खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. गणेशोत्सवापूर्वी राज्यभरातील सर्व क्षेत्रीय अभियंता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची अद्यवत माहिती संकलित स्वरूपात जमा करावी. अतिवृष्टी मुळे झालेल्या रस्त्यांच्या पूलांचा आढावा घेऊन खड्डे व दुरुस्तीचे कामे त्वरित हाती घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्सव काळात रस्ते वाहतुकीसाठी स्थितीत राहतील, याची काळजी घेऊन त्याचे नियोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ने टाकली ‘मविआ’त काडी; Sanjay Raut म्हणाले ‘हिंमत असेल तर ‘मुख्यमंत्री’ उमेदवार द्या’)

२०० किलोमीटरची पाहणी; अहवाल सादर करा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे खड्डेमुक्त रस्ते होण्यास दिरंगाई होत असल्याची बाब निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात दोन दिवस तर कार्यक्रम अभियंता यांनी आठवड्याच्या तीन दिवस रस्ते आणि पूलांची किमान दोनशे किलोमीटरपर्यंत पाहणी करावी. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला तातडीने सूचना द्याव्यात. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या अखेरीत येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केल्याचा अहवाल रस्त्यांच्या फोटोग्राफसह शासनाला दर सोमवारी सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) दिले आहेत. दरम्यान कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभांगाची कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य अभियंतांवर जबाबदारी खड्डेमुक्त रस्ते आणि पूल कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अभियंतांवर असणार आहे. रस्त्यांची त्यांनी स्वतः पाहणी करावी. आवश्यकता यंत्रणा कार्यान्वित करून रस्ते खड्डेमुक्त राहतील, याची दक्षता घ्यावी. राज्यातील बांधकाम विभागाच्या अख्यारीतील रस्ते व राष्ट्रीय महामार्गाने या सूचना लागू राहतील असेही, या अध्यादेशात नमूद केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.