मुंबई स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी हाती घेतलेल्या सुशोभीकरणासह स्वच्छता राखण्याची मोहिम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. मात्र, ही स्वच्छता प्रत्येक विभागांमध्ये राखण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना एक महिन्यांचा अल्टीमेटम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे एक महिन्यांमध्ये चहल हे महापालिकेच्या सर्व परिमंडळांचे उपायुक्त व विभागीय सहायक आयुक्तांना कामाला लावून स्वच्छता मोहिम राबवणार की एक महिन्यांमध्ये निघून जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे. चहल यांचे सर्व अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने पुढील महिन्यांमध्ये चहल यांची या पदावरून गच्छंती होईल असे बोलले जात आहे. (BMC Commissioner)
स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. स्थानिकांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, महापालिकेच्या खर्चाने त्याची दुरुस्ती, डागडुजी करावी आणि तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असेही स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयुक्त चहल यांना दिले. एवढेच नाही तर मुंबई महानगरपालिका आयुक्तांना एका महिन्याचा वेळ देत या परिसरातील स्वच्छता, डागडुजी करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (BMC Commissioner)
(हेही वाचा – Nanded : धक्कादायक ! एकाच दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू , १२ बालकांचा समावेश)
राज्याची मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबई सुशोभीकरणाची मोहिम राबवली. या मुंबई सुशोभीकरणानंतर मुंबईत मागील काही दिवसांपासून स्वच्छता मोहिम राबवतानाचा कचरा आणि राडारोडा हटवला जावा, शिवाय मुंबईला विद्रुप करणारे बॅनर व फलक काढले जावे अशाप्रकारच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर मुंबईत तेवढ्या प्रमाणात स्वच्छता राखली जात नाही. मुंबईत महापालिकेच्या निधीतून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असताना दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सरकारने लावल्याने एकप्रकारची नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यातच केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी एका बाजुला करण्याचे आदेश आणि दुसरीकडे मुख्यंत्र्यांकडून येणाऱ्या सुचना यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आता वाढत आहे. (BMC Commissioner)
त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत महापालिका आयुक्त कोणत्याही प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री तथा अन्य मंत्र्यांकडे बाजू मांडत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये ही नाराजी अधिकच वाढलेली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या सुचनांचे पालन विभागीय उपायुक्त व सहायक आयुक्तांकडून होत नाही. त्यामुळे पुढील महिन्या भरात आयुक्तांकडून याची ठोस अंमलबजावणी होणार नसून परिणामी आयुक्तांवर एक महिन्यांत कारवाई करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल, असे बोलले जात आहे. महापालिका आयुक्तांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला असून पावसाळ्याच्या कालावधीत त्यांची बदली करण्याऐवजी त्यांना त्या पदावर कायम ठेवले आहे. परंतु आता पावसाळा संपल्याने आयुक्तांची आता केव्हाही बदली होणार नसून तशाप्रकारचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी या इशाऱ्यातून दिल्याचे बोलले जात आहे. (BMC Commissioner)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community