वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.
(हेही वाचा – Aditi Tatkare : महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार)
आरोग्य आपल्या दारी मोहीम :
मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आशा २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने शहरात सुरू केले असून या दवाखान्यात सर्व उपचार मोफत होतात, तसेच या दवाखान्याच्या माध्यमातून १४३ प्रकारच्या चाचण्या विनामूल्य करण्यात येतात.
आज या दवाखान्याला भेट देऊन येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या… https://t.co/rA3DU5WHCf pic.twitter.com/YRJtNSEBwH
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 7, 2024
रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान :
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्री यांचे आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्री यांनी संवाद साधत ‘आपला दवाखाना’ विषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात; काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय)
आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू :
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत. (CM Eknath Shinde)
झीरो प्रिस्किपशन पॉलिसी :
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community