CM Eknath Shinde भल्या पहाटेच मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर; आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार

247
CM Eknath Shinde भल्या पहाटेच मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर; आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार

पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज भल्या पहाटेपासून दौरा करण्यास सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच गरज पडल्यास प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस देखील पाडू असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी पालिकेकडून रस्ते धुवून काढण्यात आले. तसेच आता रस्त्याच्या कडेला सचणारी धूळ आणि माती काढण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहने आणि फॉग मशिन्स यांची शिंदेंकडून पाहणी करण्यात आली. तसेच त्यांनी ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी काही उपयुक्त सूचना देखील केल्या.

New Project 2023 11 21T102353.520

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Accident : तब्बल ९ दिवसांनंतर पहिल्यांदा मजुरांनी मिळाली खिचडी, पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा)

या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली असली तिरही संपूर्ण मुंबईच आपल्याला साफ करायची असल्याचे मत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही यावेळी जाणून घेतली. त्यानंतर त्यांना या कामाचे महत्व पटवून देतानाच त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) चहा घेतला.

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: अल-शिफानंतर इस्रायलचे ‘हे’ आहे लक्ष्य, वाचा सविस्तर)

हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महापालिका आयुक्त,अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले आहे. विकासकामांमुळे होत असलेल्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले आहेत. एक दिवसाआड मुंबईतले रस्ते धुतले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोगही करणार आहे. दुबईतील कंपनीशी कृत्रिम पावसासाठी सामंजस्य करार करण्यात येईल. मुंबईतील बागांमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागांतील साफसफाईची पाहणी करणार आहे. कलानगरपासून सुरूवात केली आहे. केवळ कलानगर नाही तर संपूर्ण मुंबई स्वच्छ करणार आहे, असे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे म्हणाले.

New Project 2023 11 21T102516.553

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसेच मुंबई महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगार यावेळी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.