पॅराग्लायडींग (Paragliding) या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
(हेही वाचा – Shiv Jayanti : आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष)
पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-२०२४
टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग (Paragliding) प्री वर्ल्ड कप स्पर्धा-२०२४ बक्षीस वितरण प्रसंगी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj : ज्यांनी वयाच्या १५व्या वर्षी जिंकला होता गड ते शिवराय ‘छत्रपती’ कसे झाले?)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?
पॅराग्लायडींग (Paragliding) करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल, असे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community