तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज (१३ जुलै) पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात ते रस्ते, रेल्वे व बंदर प्रकल्पांचे सुमारे २९,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) टॉवर्सचे उद्घाटन करतील. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यामुळे त्यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी ‘मोदींच्या कामात प्रभू राम आणि बाबासाहेबांचं संविधान’ असल्यांचं म्हटलं आहे. (CM Eknath Shinde)
विजय तर शेवटी सत्याचाच होतो – मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, नेहमी सत्याचाच विजय होतो, विरोधकांनी संविधानाचा चुकीचा प्रचार केला. पण शेवटी मोदीजींचाच (PM Narendra Modi) विजय झाला. लोकसभेत १०० सीट्स निवडून आले तर विरोधक पेढे वाटू लागले. पण ते मोदीजींच्या विजयाचे पेढे वाटत होते. महाराष्ट्रात पाया सुविधा उभारण्यात प्रथम क्रमांक आहे. पंतप्रधान मोदी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) ठाणे-बोरिवली प्रकल्प आणि बीएमसीच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. दोन्ही प्रकल्पांमध्ये दुहेरी बोगदे आहेत. एमएमआरडीएच्या प्रवक्त्यानुसार, ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प १६,६०० कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. हा ट्विन ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) खालून जाणार असून, बोरिवलीतील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाण्यातील घोडबंदर रोड यांच्यात थेट संपर्क निर्माण होईल. ११.८ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली लिंक रोडच्या बांधकामामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास १२ किमीने कमी होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रवाशांचा सुमारे १ तासाचा वेळ वाचणार आहे.
(हेही वाचा – मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य; PM Narendra Modi यांची घोषणा)
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. ६,३०० कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पातील दुहेरी बोगदे गोरेगावमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला मुलुंडमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडतील. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यानुसार, गोरेगाव मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी ६.६५ किमी आहे. यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील ७५ मिनिटांचा प्रवास २५ मिनिटांत पूर्ण करता येईल. याशिवाय नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
(हेही वाचा – मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य; PM Narendra Modi यांची घोषणा)
मोदीजी आपल्या कामात प्रभू राम आहेत. आपल्यासोबत बाबासाहेबांचं संविधान आहे. एनर्जी, कमिटमेंट यांचा एकच अर्थ आहे, मोदीजी. महायुती सरकारनं दोन वर्षांत जे पायाभूत सुविधांचे जाळं विणलं ते केवळ नरेंद्र मोदींच्या पाठबळामुळेच. त्यामुळं मोदी हे गतिशक्तीचे हे प्रतीक आहेत. ठाणे-बोरिवली हा प्रकल्प माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. याचं शनिवारी भूमिपूजन झाले. या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागतात, तो प्रवास आता १२ मिनिटांत होणार आहे. नरेंद्र मोदींच्या हाताला परिस लागला आहे. त्यांचा हात ज्या कामाला लागतो, त्याचं सोनं होतं, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community