- विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र राज्य शासनाकडून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सहा शिक्षकांना ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ (Teacher Award) प्रदान करण्यात आला आहे. या सर्व शिक्षकांचा महानगरपालिका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. आदर्शवत कामगिरी करुन महानगरपालिकेच्या सर्व शाळांसमोर आदर्श उभे करणाऱ्या या सर्व शिक्षकांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कौतूक केले. यंदा महापालिकेच्या शाळांमधील तब्बल पाच शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष शिक्षक गटातून पंतनगर महानगरपालिका इंग्रजी शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता अनिल जाधव यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या राज्यातील एकमेव शारीरिक शिक्षण शिक्षिका आहेत.
महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदींनींही सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
(हेही वाचा – Mumbai-Goa Highway साठी अजून दोन वर्षांची प्रतिक्षा)
महाराष्ट्र राज्य शासनाकडून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील विविध विभागातील निवडक शिक्षकांचा ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ (Teacher Award) देऊन गुरुवारी ५ सप्टेंबर २०२४ रोजी सन्मान करण्यात आला. यामध्ये महानगरपालिकेच्या देवनार वसाहत इंग्रजी शाळा क्रमांक १ येथील इंग्रजी विषयाच्या सहायक शिक्षिका सविता संदीप जगताप, मढ मराठी मुंबई स्कूलच्या सहायक शिक्षिका आशा अशोक ब्राम्हणे, मालाड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या सहायक शिक्षिका पूर्वा प्रवीण संख्ये आणि संत कंकय्या हिंदी शाळा क्रमांक २ येथील शिक्षक रवींद्र पाटील यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गोरेगाव (पूर्व) महानगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या सहायक शिक्षिका गौरी राजेंद्रकुमार शिंदे यांना ‘थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार’ (Teacher Award) प्रदान करण्यात आला. संपूर्ण मुंबईमधून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव शिक्षिका आहेत. विशेष शिक्षक गटातून पंतनगर महानगरपालिका इंग्रजी शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता अनिल जाधव यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या राज्यातील एकमेव शारीरिक शिक्षण शिक्षिका आहेत. पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांनी महानगरपालिका शाळेमध्ये अनेक अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबत संशोधन, लेखन, साहित्यनिर्मिती आदी बाबतीतही मोलाचे योगदान दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community