बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. (CM Eknath Shinde) महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या (Maharojgar Melava) माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. नमो महारोजगार मेळावा (Maharojgar Melava) व करिअर मार्गदर्शन शिबिरास श्री. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा- Dongri Unauthorized Building : डोंगरीमधील लक्ष्मी इमारतीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण? )
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा (Maharojgar Melava) व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)
राज्यात नागपूर, लातूरनंतर अहमदनगर येथे नमो विभागीय रोजगार मेळावा (Maharojgar Melava) होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून (Maharojgar Melava) लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार असल्याचे श्री. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community