CM Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार

छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी जीवनभर अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा साम्राज्यापेक्षा १५ पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले.

178
CM Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Swaraj Rakshak Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी करण्यासाठी शासन अत्याग्रही असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.

(हेही वाचा – Metro Line 12 : कल्याण-डोंबिवलीवरून अवघ्या ४५ मिनिटांत नवी मुंबईत पोहचता येणार; मेट्रो १२ची किमया)

छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ विकास आराखडा भूमिपूजन :

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रम व जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळापूर ता. हवेली जिल्हा पुणे येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे उपाध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री राहुल कुल, महेश लांडगे , अशोक पवार, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अप्पर आयुक्त कविता द्विवेदी, पूर्व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

(हेही वाचा – MSRTC : एसटीच्या चालक-वाहकांसाठी पहिले वातानुकूलित विश्रांतीगृह; मुंबई सेंट्रल आगारात काम सुरु)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की;

छत्रपती संभाजी महाराजांनी (CM Eknath Shinde) मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी जीवनभर अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा साम्राज्यापेक्षा १५ पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या संपूर्ण जीवनात हे एकही लढाई हरले नाहीत. ते प्रखर धर्माभिमानी होते. धर्मकारण, अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार शासन करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(हेही वाचा – Nitin Gadkari: भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही, राजकीय वर्तुळात चर्चा)

छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही – एकनाथ शिंदे

गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. (CM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.