- प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या डोळ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिर्डीच्या दौऱ्यासह अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत आहेत. कोणीही यात तर्कवितर्क काढू नका, असे आवाहन शिवसेना प्रसार माध्यम विभागाने केले आहे. या वर्षभरात मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर ही दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने घोषित केलेले योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम आयोजित केले जात आहे. शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत शिर्डी येथे दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार, तसेच डिफेन्स क्लस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
(हेही वाचा – रेशीमबाग ते केशवकुंज; RSS चे मुख्यालय दिल्लीत?)
तसेच राहुरी तालुक्यात अणू ऊर्जा आधारित कांदा महाबँकेच्या कार्याचा शुभारंभ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन संस्थेच्या प्रस्ताविक न्युक्लिअर थीम पार्क कार्यालयाच्या भूमीपूजन, ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण व राज्यातील प्रगत शेतकरी संवाद मेळावा बाबुळगाव येथील हिंदुस्तान ऍग्रो को. ऑप. येथे दुपारी ४ वाजता होणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) डोळ्यावर ठाणे येथील रुग्णालयात लेझर ट्रीटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम रद्द झाल्याने उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यावर शिवसेना प्रसार माध्यम विभागाने खुलासा केला आहे.
शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डोळ्याची विशेष काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शिर्डी येथील महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार कार्यक्रम आणि राहुरी येथील कांदा महाबँकेचा भूमिपूजन सोहळा तसेच आजचे इतर दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर कोणतेही तर्कवितर्क लावू नयेत, असे आवाहन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community