चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM Eknath Shinde यांच्याकडून पाहणी ; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर  

166
चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM Eknath Shinde यांच्याकडून पाहणी ; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर  
चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM Eknath Shinde यांच्याकडून पाहणी ; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर  

मुंबई उपनगरातील चेंबूर (Chembur Fire News) येथील सिद्धार्थनगर परिसरात एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. रविवार, ६ ऑक्टोबर रोजी पहाटे सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्घटना घडली. या घरातील कुटुंबियांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील ७ जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ७ वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रविवारी या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.  (CM Eknath Shinde)

दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Maha Kumbh : सुरक्षेसाठी महाकुंभात स्नान करण्यासाठी येण्याची आधारकार्ड तपासा, आखाड्याची मागणी)

मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे आग 

घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर ही आग घरात पसरत गेली. पारिस गुप्ता (वय ७), मंजू प्रेम गुप्ता (वय ३०), अनिता प्रेम गुप्ता (वय ३९), प्रेम गुप्ता (वय ३०), नरेंद्र गुप्ता (वय १०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.