२०१७ च्या सीएम फेलोशिपचा लाभार्थी बनला आयएएस अधिकारी; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, हा तरुण….

65
२०१७ च्या सीएम फेलोशिपचा लाभार्थी बनला आयएएस अधिकारी; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, हा तरुण....
२०१७ च्या सीएम फेलोशिपचा लाभार्थी बनला आयएएस अधिकारी; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, हा तरुण....

सन २०१५- १६ आणि २०१९-२० या कालावधीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ सुरु केला होता. ही फेलोशिप मिळवलेल्या एक विद्यार्थ्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी (Devendra Fadnavis)हरियाणा दौऱ्यावर भेट झाली. विशेष बाब म्हणजे, तो तरुण हरियाणात आयएएस अधिकारी म्हणून नियुक्त झाला आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या तरुणासोबत फोटो काढून हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे.

( हेही वाचा : Fraud : माजी राज्यसभा खासदार यांची एका कथित वकिलाकडून फसवणूक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली की, हरियाणा दौऱ्यात माझी दीपक करवा यांच्याशी भेट झाली. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात २०१७ साली दीपक करवा यांची महाराष्ट्र सीएम फेलो म्हणून निवड झाली होती. आता हेच करवा आता हरियाणात आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सुरु केलेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ अनेक तरुणांसाठी लाभदायक ठरला आहे.

मात्र महाविकास आघाडीची ( Mahavikas Aghadi) सत्ता येताच त्यांनी ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ ३० जानेवारी २०२० च्या शासननिर्णयानुसार बंद केला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची मागणी पाहता महायुती सरकारने २० जानेवारी २०२३ ला पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ शासनामार्फत सुरु केला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.