राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये आता नियोजन विभागाच्या समन्वयाने मदत कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. महापालिकेचे कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्या मदतीने हे मदत कक्षात महिलांना अर्ज कसा भरावा याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना घराघरांत पोहोचवून महिलांना याचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मागील आठवड्यात एक बैठक घेऊन सर्व विभाग कार्यालयांमध्ये यासाठीचे मदत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका नियोजन विभागाच्या समन्वयाने हा मदत कक्ष स्थापन करण्यात येत असून याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवली आहे. यामध्ये महापालिकेच्या नियोजन विभागाचे समाज विकास अधिकारी, समुदाय संघटक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदींसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हे महिलांसाठी या योजनेची माहिती व अर्ज भरुन घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana)
(हेही वाचा – BMC : महापालिकेतील अभियंत्यांची भरती जरांगे पाटील यांच्यामुळे अडली)
महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र महिलांकडून ऑनलाइन अर्ज भरुन घेतले जात आहेत. शिवाय, विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रावरही (सीएफसी) ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नागरिकांनीही या योजनेसाठी अर्ज करण्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची रक्कम कुणालाही देऊ नये. परंतु, कुणी व्यक्ती किंवा संस्था याबाबत शुल्काची मागणी करत असेल तर त्यांच्याबाबत संबंधित विभाग कार्यालयास कळवावे, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community