CM Relief Fund : सीमा भागातील नागरिकांना आरोग्य मदत सुलभ करण्याचा प्रयत्न 

29
CM Relief Fund : सीमा भागातील नागरिकांना आरोग्य मदत सुलभ करण्याचा प्रयत्न 
CM Relief Fund : सीमा भागातील नागरिकांना आरोग्य मदत सुलभ करण्याचा प्रयत्न 

राज्यातील तसेच सीमा भागातील गरजू नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Relief Fund) कक्ष प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कक्षप्रमुख रामेश्वर नाईक (Rameshwar Naik) यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली सीमावर्ती गावांना सातत्याने आर्थिक सहाय्य दिले जात असून, ही मदत आणखी सुलभ करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.

वैद्यकीय मदत प्रमुख आनंद आपटेकर यांची भेट

महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय मदत प्रमुख आनंद आपटेकर यांनी मंत्रालयात रामेश्वर नाईक (Rameshwar Naik) यांची भेट घेतली. सीमा भागातील नागरिकांना तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी विनंती त्यांनी केली. यावर सीमा भागातील रुग्णालयांसाठी नवीन संलग्नीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अर्ज केलेल्या रुग्णालयांवर प्राधान्याने कार्यवाही होईल, असे नाईक (Rameshwar Naik) यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Sexual Assault : मशिदीमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; ८० वर्षीय मौलवीला अटक)

वैद्यकीय मदतीसाठी नवीन कार्यपद्धती

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Relief Fund) आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. आर्थिक सहाय्याच्या निकषांचे पुनर्विलोकन, मदतीच्या प्रक्रियेला गती आणि पारदर्शकता देण्यासाठी शासनाने नवा शासननिर्णय जारी केला आहे.

जनजागृतीसाठी विशेष मोहिम

सीमा भागातील गरजू नागरिकांना नवीन कार्यप्रणालीची माहिती मिळावी यासाठी लवकरच विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यामुळे निधीचे वितरण अधिक प्रभावी आणि सुलभ होईल. तसेच सीमा भागात आरोग्य शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.

राज्यातील तसेच सीमा भागातील रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Relief Fund) व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ९३२११०३१०३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.