प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन नको, मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

75

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी असेही आवाहन केले आहे की, अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती करतो की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका.

‘राजकीय पक्षांनी राजकीय पोळ्या भाजू नका’

आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चेतावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.

परिवहन मंत्र्यांनी केले आवाहन

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. ते असे म्हणाले, आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले आहे. सरकार म्हणून लोकांनाही आम्ही जबाबदार आहोत. प्रशासनाचा धाक म्हणून काल निलंबनाची कारवाई झाली आहे. कुणावरही कारवाई करण्याची सरकारची इच्छा नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती करतो की, कर्मचाऱ्यांनी हा संप थांबवावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.