मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मास्क वापरण्याचे आवाहन

86

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही वाढ जरी संथपणाने होत असली तरी सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. कोरोना अजून संपूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सध्या कोरोनाने बाधित केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 18 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन आपण सावधगिरीने वागायला हवं. त्यासाठी मास्क घालणे आणि लसीकरणाला प्रोत्साहन देणे या गोष्टी करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः एकट्या मुंबईतच नवे ३५० रुग्ण तर राज्यात किती, जाणून घ्या आकडेवारी)

अशी आहे राज्यातील स्थिती

सध्या मुंबईतील रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून, ठाण्यात 27.92 तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनुक्रमे 18.52 आमि 68.75 टक्के वाढ झाल्याचे समजत आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आता राज्यात २ हजार ३६१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ८ कोटी ८ लाख १३ हजार ३४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ८४ हजार ३२९ रुग्णांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.