शिर्डीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

107

विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करुन सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. बुधवारी ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

(हेही वाचाः चहलला संघातून आऊट केल्याने सेहवागची बीसीसीआयवर फटकेबाजी)

पर्यटन व्यवसायाला मिळेल चालना

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश-विदेशातून करोडो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल, रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

उपयोगिता लक्षात घेऊनच विकास व्हावा

केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करुन त्याचा विकास करण्यात येऊ नये, तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

(हेही वाचाः मुंबई मेट्रो देणार मुंबईकरांना ‘न्यू ईयर गिफ्ट’! ‘या’ दोन मार्गिका सूरू होणार)

नागपूर मिहान मधील ज्या विविध कंपन्यांना जागा देण्यात आली आहे त्याचाही आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला व तेथे उत्पादन योग्य रीतीने सुरू ठेवण्याबाबतही निर्देश दिले. बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधा, विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.