…म्हणून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरलेच नाही!

खराब वातावरण, कमी दृश्यमानता यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर लँड झाले नाही. ते गिरट्या घालत पुन्हा एकदा पुणे विमानतळाकडे परतले.

सध्या सातारा येथेही पूरग्रस्त परिस्थिती आहे. याठिकाणी आंबेघर येथे दरड कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातारा येथे जाण्यासाठी निघाले, मात्र त्यांचे हेलिकॉप्टर कोयना नगरला पोहचले परंतु तेथील हेलिपॅडवर लँड न होताच पुन्हा पुणे विमानतळावर परतले. खराब दृश्यमानतेमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचा सातारा दौरा रद्द केला

हेलिकॉप्टर पुन्हा पुणे विमानतळाकडे परतले!

मुख्यमंत्री ठाकरे यांचा सातारा दौरा हा महत्वाचा होता. तेथील दरडग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा होता. कोयना नगर येथे मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती, तसेच ढगाळ वातावरण होते, म्हणून कोयनानगरी येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही, ते हेलिकॉप्टर पुन्हा पुणे विमानतळाच्या दिशेने परतले. कोयना नगरी हेलिपॅड हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी सज्ज होते. त्याठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज होती. त्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हजर होते. मात्र खराब वातावरण, कमी दृश्यमानता यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर लँड झाले नाही. ते गिरट्या घालत पुन्हा एकदा पुणे विमानतळाकडे परतले. सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा दौरा रद्द केला, असे म्हटले. या भागात मोबाईल नेटवर्क बंद पडले आहे.

(हेही वाचा : कारगिल विजय दिवसः भारतीय सेनेने आवळल्या भ्याड पाकड्यांच्या नाड्या)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here