मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना टास्क फोर्सची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा करण्यात आली असून, राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सध्यातरी मास्क सक्ती करण्याइतकी भीषण परिस्थिती नाही. पण गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याचबाबत गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले. वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे त्यामुळे मास्कसक्ती करण्यात आली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर अवश्य करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः देशमुखांच्या अडचणी वाढल्या, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल)
उपमुख्यमंत्र्यांचेही आवाहन
कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तर ती कशी हाताबाहेर जाते, हे आपण सर्वांनीच याआधीच्या तिन्ही कोरोना लाटांमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य सरकार, टास्क फोर्स व वैद्यकीय शिक्षण विभागागकडून याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. पण परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जनतेने मास्क वापरपावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community