सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजीसह घरगुती गॅस महागला!

आधीपासूनच सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीमुळे त्रस्त आहे. त्यात आता पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामान्यांना सामना करावा लागणार आहे. मुंबईत सुधारित दरानुसार, सीएनजी प्रति किलो 2.50 रुपयांनी, तर घरगुती पाईप गॅस 1.50 रुपये प्रति युनिटने महाग झाला आहे. मुंबई आणि परिसरातील या सुधारित दर वाढीनुसार, सर्व करांसह सीएनजी आता 66 रुपये प्रति किलो तर पीएनजी 39.50 प्रति युनिट दराने मिळणार आहे.

वर्षभरात 18 रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ

गेल्या वर्षभरात म्हणजे फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सीएनजीच्या दरात 18 रूपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 48 रूपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता जानेवारी 2022 मध्ये 66 रूपये प्रति किलोने मिळणार आहे.

( हेही वाचा: किशोर वयीन मुलांच्या लसीकरणाला गतिमान करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश )

‘इतक्या’ लोकांना बसणार फटका 

घरगुती गॅसच्या दरात झालेल्या या वाढीचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे. सध्याच्या दरवाढीमुळे मुंबई आणि आसपास राहणाऱ्या 16 लाख लोकांचे आणि गॅसवर चालणाऱ्या 8 लाख वाहनधारकांचे बजेट वाढणार आहे. म्हणजेच नवीन किंमतीमुळे एकूण 24 लाख लोकांना फटका बसणार आहे. अलीकडे, MGLने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती दोनदा वाढवल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणि पुन्हा डिसेंबरमध्ये वाढ जाहीर करण्यात आली.मात्र MGLने असे आश्वासन दिले आहे की नवीन दरवाढ असूनही, सीएनजी सध्याच्या किमतींवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे सुमारे 59 टक्के आणि 30 टक्के आणि PNG किमतींच्या तुलनेत सुमारे 22 टक्के आकर्षक बचत देते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here