सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. 17 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार आहेत. अशातच आता मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात झाली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आली आहे. तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. या दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना सीएनजी मुंबईमध्ये 80 रुपये प्रति किलो मिळणार आहे. पीएनजी 48.50 रुपयांना मिळणार आहे. तर पुण्यात सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे.
( हेही वाचा: मोबाईल कंपनी फ्री इंटरनेट ऑफर करत असेल तर सावध रहा, अशी होत आहे फसवणूक )
सीएनजीच्या दरात घट
गॅसच्या दरात मात्र कपात झाली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो कपात झाली आहे. पीएनजी दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. 17 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत.
Join Our WhatsApp Community