मुंबईकरांना दिलासा! CNG अडीच रुपयांनी स्वस्त, ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार

207

वाढत्या महागाईत मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. एका बाजूला पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला असताना दुसऱ्या बाजूला सीएनजीचे दर कमी झाले आहेत. गेले कित्येक दिवस सीएनजीचे दर सुद्धा सातत्याने वाढत होते परंतु आता सीएनजीचे दर पहिल्यांदाच कमी करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : Budget 2023 : तंत्रज्ञान क्षेत्राला अर्थसंकल्पातून काय मिळणार? बजेटकडे देशाचे लागले लक्ष )

सीएनजी स्वस्त, मुंबईकरांना दिलासा 

मुंबई आणि उपनगरात सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त झाला आहे. महानगर गॅसचे नवे दर लागू करण्यात आले असून आता ८७ रुपये प्रतिकिलो दराने सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वाहनचालकांना फायदा 

मुंबईत टॅक्सी-रिक्षाचालकांसह याचा फायदा सार्वजनिक वाहतूक तसेच जी खासगी वाहने सीएनजीचा वापर करत आहेत अशा सर्व मुंबईकरांना सीएनजी स्वस्त झाल्याने दिलासा मिळणार आहे. सध्याचा सीएनजीचा दर हा पेट्रोल-डिझेलपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे त्यामुळे सीएनजी आणखी स्वस्त झाल्याचा वाहनचालकांना निश्चित फायदा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.