वाढत्या महागाईचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच आता नागपूरमध्ये सीएनजी गॅसची किंमत १२० रुपये प्रतिकिलो आहे. नागपुरात केवळ सीएनजीच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ८ मार्चला डिझेलचे दर 92.51 रुपये प्रतिलिटर तर, पेट्रोलचे दर 109.75 रुपये प्रतिलिटर होते.
( हेही वाचा : भोजन थाळीतही घोटाळा, 26 रुपयांच्या थाळीसाठी 62 रुपये मोजावे लागताहेत! )
सीएनजीच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ
नागपुरात सीएनजीच्या दरात अचानक वाढ झाली आहे. ५ मार्चला सीएनजीची किंमत प्रति किलो शंभर रुपये होती. मात्र अवघ्या दोन दिवसांत सीएनजीच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ होऊन, सीएनजी १२० रुपये प्रतिकिलो झाला आहे. नागपुरात गुजरातमधून एलएनजी आयात करून त्यावर प्रक्रिया करून त्याचे सीएनजीमध्ये रूपांतर केले जाते. नागपुरात केवळ 3 सीएनजी पंप असून ते रोमेट ही खासगी कंपनी चालवत आहेत.
( हेही वाचा : एसटी महामंडळात रुजू होण्यासाठी महिलांना करावी लागणार आणखी प्रतिक्षा! )
नागपुरात सीएनजी इंधनावर याच कंपनीची मक्तेदारी आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नागपूरपर्यंत गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर सीएनजीच्या दरात घट होऊ शकते. गुजरातमधून नागपुरात एलएनजी आणण्याचा खर्चही वाढला. त्यामुळे सीएनजीचे दर वाढले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, सीएनजीच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे वाहनचालकांना चांगलाच धक्का बसला आहे.
Join Our WhatsApp Community