पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आणि गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का (CNG Price Hike) बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळं मुंबईतील प्रवास महागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता मुंबईत पीएनजी आणि सीएनजीचे दर देखील वाढणार आहेत. महागनगर गॅस लिमिटेडनं दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (CNG Price Hike)
डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्यानं महागनगर गॅस लिमिटेडकडून पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनजीचे दर 1 रुपयानं तर सीएनजीचे दर 1.50 रुपये प्रति किलो प्रमाणं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत हा निर्णय 8 एप्रिलच्या आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासू लागू होईल. (CNG Price Hike)
महानगर गॅस लिमिटेडनं बदललेल्या दरानुसार पीएनजीसाठी 49 रुपये प्रति SGM असेल. तर सीएनजीचे दर देखील वाढवण्यात ले असून ते 79.50 रुपये असतील. सीएनजीचे दर 79.50 रुपये प्रति किलो असेल. महानगर गॅसनं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या दरांच्या तुलनेत सीएनजी अनुक्रमे 47 टक्के आणि 12 टक्के स्वस्त आहे. महानगर गॅसच्या ग्राहकांनी बिलं भरण्याचं आवाहन केलं आहे. (CNG Price Hike)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community