सध्या महागाईने उच्चांक गाठला असून, पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच सीएनजीच्या किंमती वाढत आहेत. पुणे शहरात सीएनजीच्या दरात किलोमागे २.२० रुपयांनी वाढ झाली आहे. अखिल भारतीय पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले की, पुणे शहरात २९ एप्रिलपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) चे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता शहरात सीएनजी २.२० पैशांनी वाढून ७७.२० रुपये प्रति किलो होणार आहे. यापूर्वी शहरात सीएनजीचा दर ७५ रुपये किलो होता. नैसर्गिक दरात वाढ केल्यानंतर आता सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात महिन्याभरात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )
सीएनजी महागला
पुणे शहरातील सीएनजीच्या दरात महिनाभरात चार वेळा वाढ करण्यात आली असून आतापर्यंत एकूण १५ रुपये किलो दरवाढ झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला येथे सीएनजीची किंमत ६२.२० रुपये प्रति किलो होती. १३ एप्रिलला ५ रुपयांनी वाढ होऊन सीएनजीची किंमत ७३ रुपये झाली होती. यानंतर १८ एप्रिलला त्यात २ रुपयांनी वाढ होऊन सीएनजीचे दर ७५ रुपये किलोवर पोहोचले, या वाढीनंतर सीएनजी एकूण १५ रुपयांनी महागला आहे.
Join Our WhatsApp Community