पुण्यात येत्या १ नोव्हेंबरपासून सीएनजी पंप बंद राहणार आहेत. २० ऑक्टोबरपासून सीएनजी पंपांनी बेदमुत सीएनजी विक्रीचा बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता दिवाळीचे कारण सांगत संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जमा होईपर्यंत अनिश्चित काळासाठी CNG सेल बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डिलर असोसिएशनने घेतला आहे. यापूर्वीही सीएनजी पंप बंदची हाक देण्यात आली होती.
( हेही वाचा : ट्रेनच्या तिकिटासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; रेल्वेच्या या नव्या सुविधेद्वारे मिळेल झटपट तिकीट )
ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल
कंपनीने जर डिलर्सच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर डीलर्सने बेमुदत संपावर जाण्याची भूमिका घेतलेली आहे. अशी माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिली आहे. पेट्रोल – डिझेल महाग झाल्यानंतर पुण्यात आणि एकूणच राज्यात सीएनजीवरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अशावेळी ऐन दिवाळीतच सीएनजी पंप बंद राहिले तर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकतात.
Join Our WhatsApp Community