विविध सरकारी योजनांचा थेट लाभ हा नागरिकांना त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून देण्यात येतो.त्यामुळे नागरिकांना या योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होते. त्यामुळेच आता को-ऑपरेटिव्ह बँकांच्या खातेधारकांसाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच को-ऑपरेटिव्ह बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर(DBT)शी जोडण्यात येणार आहे.
यामुळे या बँकेतील खातेधारकांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमाला शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली.
(हेही वाचा: पश्चिम रेल्वेवर केव्हा धावली पहिली लोकल? स्टेशनची नावं सुद्धा होती हटके )
सहकार क्षेत्राला मजबूती
बँकिंग क्षेत्रात सुरुवातीपेक्षा जास्त बदल घडून आले आहेत.को-ऑपरेटिव्ह बँक खात्यांना डीबीटीशी जोडल्याने नागरिकांशी संपर्क वाढून सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. जनधन योजनेच्या माध्यमातून तब्बल 45 करोड नवीन खातेधारकांनी नवीन बँक खाती उघडली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकारातून समृद्धी या धोरणामुळे हे शक्य झाले आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले.
डिजिटल व्यवहारांत वाढ
तसेच डिजिटल व्यवहारात सुद्धा पूर्वीपेक्षा जास्त वाढ झाल्याचे शहा म्हणाले. जनधन खात्यांद्वारे करण्यात आलेल्या डिजिटल व्यवहारांनी ट्रिलीयन डॉलरचा टप्पा पार केला आहे. 2017-18 च्या तुलनेत आता डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, असेही शहा यांनी सांगितले.