राज्यामध्ये सध्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याचं राज्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असल्याने राज्यात बत्ती गुल होण्याची तसेच, संपूर्ण राज्य अंधारमय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी मुंबई तासाभरासाठी अंधारात गेली होती, आता ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार संपूर्ण राज्यच काळोखात जाण्याची शक्यता आहे. राज्यात भारनियमन सुरु होण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
फक्त समित्या गठीत केल्या जातात
राज्यातील वीजेच्या या स्थितीवर आक्षेप नोंदवताना, भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याआधीही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याने, पाठक यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. खर तर अशा घटना घडतात तेव्हा आपल्याला आलेल्या अनुभवातून काही शिकायच असतं. केवळ उच्चस्तरीय समित्या गठीत करुन चालत नाही. त्या समित्यांच्या निकालाचं काय झालं? त्या अंमलबजावणीचं काय झालं? ते न सांगता पुन्हा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी समिती गठीत केल्याचे सांगितले आहे. असं म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या अशा वक्तव्याचा विरोध केला आहे.
( हेही वाचा: ‘मला वर जायच नाही, तुमच्या सोबतच रहायचय’, असे का म्हणाले छत्रपती संभाजी? )
निष्क्रिय सरकार
खर तर काल रविवार होता, तशी विजेची मागणी कमी होती. विजेवर भार कमी होता, तरीही सरकारला रविवारी वीजपुरवठा नियंत्रित करता आला नाही. याचाच अर्थ असा की, यंत्रणा पूर्णपणे निष्क्रीय आहे. अतिशय अकार्यक्षम अशी यंत्रणा आहे. राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वत: उर्जा विभागाचे सचिव असल्याने त्यांनी जातीने लक्ष देणे आवश्यक होते. त्यामुळे हा पूर्णपणे अकार्यक्षमपणा आहे. सरकारला या पूर्ण कामाची माहिती नाही, हेच यावरुन सिद्ध होतं असल्याचे पाठक म्हणाले.
Join Our WhatsApp Community