मुंबई महापालिकेचा सर्वांत प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील (Coastal Road) एक मार्गिक वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून या एका मार्गिकेमधून सध्या पाण्याची गळती लागलेली दिसून येत आहे. या पाणी गळतीच्या तक्रारींबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापलिका आयुक्तांसह संबंधित कंपनी आणि तज्ज्ञ मंडळींसह कोस्टल रोड प्रकल्प मार्गिकेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मात्र, ही पाण्याची गळती जोडणीच्या ठिकाणी होत असून या जोडणीच्या ठिकाणी पॉलिमर ग्राऊंटींग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गिकांमधील प्रत्येकी २५ जोडणीच्या ठिकाणी इजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊंटींग करून कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Coastal Road)
मुंबई कोस्टल रोडवर सुरू झालेल्या पाणी गळतीच्या घटनेची दखल घेत आज याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोस्टल रोडच्या बोगद्यातील दोन सांध्यांच्या जोडणीमधून पाणी येत असल्याचे समजले. असे असले तरीही त्यामुळे कोस्टल रोडच्या मूळ ढाच्याला कोणताही धोका नाही. तरीही ही गळती थांबवण्यासाठी… pic.twitter.com/kVMyKpE7aR
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2024
गळतीमुळे मुख्य बांधकामाला कोणताही धोका नाही – मुख्यमंत्री
कोस्टल रोड (Coastal Road) मार्गात अनेक ठिकाणी पाणी गळती लागल्याने याबाबतचे वृत्त अनेक वाहिन्यांमध्ये दाखवण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त चक्रधर कांडलकर यांच्यासह कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता आणि संबंधित कंपनीचे पदाधिकारी व तज्ज्ञ मंडळींसह प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना शिंदे यांनी या गळतीमुळे मुख्य बांधकामाला कोणताही धोका नसून केवळ जोडणीच्या ठिकाणांहून पाण्याची गळती होत आहे. दोन ते तीन ठिकाणी जोडणीच्या ठिकाणी गळती दिसून येत आहे. त्यामुळे या गळतीमुळे बांधकामाला कोणताही धोका नसून इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊंटींग केल्यास याचे निवारण केले जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले, असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. (Coastal Road)
मात्र, असे जरी असले तरी या केवळ दोन ते तीन ठिकाणांऐवजी दोन्ही मार्गिकांमधील प्रत्येकी २५ ठिकाणी असलेल्या जोडणीच्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊंटींग केले गेले पाहिजे अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जाणार आहे. मात्र, बांधकामाला धोका असता तर वाहतुकीसाठी मार्गिका बंद केली असती, पण येथील वाहतूक बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या ग्राऊंटींगचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आपण आरोप प्रत्यारोपांमध्ये जात नसून यामुळे लोकांसाठी कोणताही धोका नसून ग्राऊंटींग केल्यास ही गळतीही कायमची बंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Coastal Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community